डॉ सौ. केतकीताई पाटील

Ketakitai Patil    26-Dec-2023
Total Views |
सकारात्मक धोरण आणि विकासाची आस, सर्वांपर्यंत विविध योजना आणि सेवा देणे यासाठी सातत्य आणि प्रयत्नांचा ध्यास!!!
 

डॉ. केतकी उल्हास पाटील या जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुलभ आरोग्य सुविधा, शिक्षणाचा स्त्रोत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि निरंतर विकासाचे धोरण राबवणे आणि कामात सातत्य राखणाऱ्या सुधारक आहेत. मूलतः सामाजिक कार्यकर्त्या असल्याने आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. केतकी उल्हास पाटील यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर काम करताना वास्तवाची जाणीव झाली आणि समाजासाठी आपण काही केले पाहिजे या उद्देशाने समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

 
 
वैयक्तिक माहिती :
 
वडिलांचे नाव : डॉ. उल्हास व्ही पाटील
माजी खासदार, रावेर मतदारसंघ
 
आईचे नाव : डॉ. वर्षा यु पाटील
(प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ , जळगाव जिल्हा )
 
जन्मतारीख : ९ ऑगस्ट १९८८
विवाहित/अविवाहित : विवाहित
 
पतीचे नाव : डॉ. वैभव पाटील
 
शैक्षणिक पात्रता : एम बी बी एस (२०१२), एम डी (रेडिओलॉजी)
 
व्यवसाय : डॉक्टर
 
कायमचा पत्ता : गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केट, जळगाव.