पाचशे वर्षाच्या कालखंडानंतर समस्त भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचे 22 जानेवारी 2024 रोजी भव्य दिव्य मंदिर अयोध्येत राम भक्तांसाठी खुले होणार आहे. हे मंदिर नसून येथील बहुसंख्य लोकांच्या अस्मितेचा मानबिंदूच आहे. याचेच औचित्य साधून विश्व हिंदू परिषदे कडून पूर्ण देशात '#अक्षत_पुजा' कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात देशात भक्तीभावाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदही क्षणी आज जळगाव जिल्हा अतंर्गत झालेल्या अक्षत पुजेस मी व माझे पती डॉ.वैभव पाटील यांनी उपस्थिती लावून पूजा आणि हवन केले.याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे जैन समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, ललित भैय्या (भैय्या भाऊ) चौधरी आणि जळगावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.