सैनिकांच्या त्यागात त्यांच्या परिवाराचाही सहभाग असतो

Ketakitai Patil    28-Dec-2023
Total Views |

सैनिकांच्या त्यागात त्यांच्या परिवाराचाही सहभाग असतो


कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या परिवारासोबत #दीपोत्सव साजरा करण्याचा आनंद अद्भुत
 
दिवाळीला सुरुवात झाल्यापासून दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अर्थात वसुबारसला भुसावळ तालुक्यातील आदर्शगाव फुलगाव येथे कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या परिवाराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत साधलेला संवाद, त्यांचे अनुभव ऐकून त्यांच्या प्रती आदर वाढला.

भारतीय सैनिकांमुळे देशातील जनता सुरक्षितपणे आपले उत्सव साजरे करत असतात. पण ड्युटीवर असलेल्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सैनिक मुलांशिवाय दिवाळी साजरी करावी लागते. या अनुषंगाने गुरुवार 9 रोजी #फुलगावात जाऊन जे सैनिक या दिवाळीला गावी येऊ शकत नाही अशा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी सैनिक भूषण विलास पाटील जे #राजस्थान येथे कर्तव्यपूर्ती करत आहे त्यांची आई शैला विलास पाटील, काकू रेखा शंकर पाटील, काका किशोर मोरेश्वर पाटील,संगीता किशोर पाटील यांना शुभेच्छा दिल्या . भूषण यांच्या आईने व्यक्त केलेल्या भावना जाणून केवळ सैनिकच त्याग करत नाही तर या त्यागात त्यांच्या परिवाराचाही मोलाचा वाटा असतो ही भावना अधिक दृढ झाली.
 
#दिल्ली येथे ड्युटी वर असलेले सैनिक देवेंद्र चंद्रकांत महाजन यांच्या घरी त्यांचे वडील चंद्रकांत भालचंद्र महाजन, आई पुष्पा महाजन, भाऊ भूषण महाजन, शीतल भूषण महाजन यांना शुभेच्छा दिल्या.
 
तसेच #आसाम येथे ड्युटीवर असलेले अतुल शिंदे यांच्या घरी भेट दिली यावेळी त्यांचे वडील रमेश दगडू शिंदे, आई आशा शिंदे ,मयुरी अतुल शिंदे व अतुल यांचा मुलगा व मुलगी उपस्थित होते.अतुल यांचा लहान भाऊ निलेश हा सशस्त्र सेनादल मध्ये सिक्कीम येथे कार्यरत आहे.याच गावातील योगेश अशोक पाटील हा पॅरा आर्मी मध्ये आग्रा येथे आहे. तो हवालदार पदावर आहे.त्याचे वडील अशोक रामचंद्र पाटील व आई कल्पना पाटील यांची भेट घेऊन दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
 
या गावातील बहुतांश सैनिक दिवाळीला अनेक वर्षे घरी येऊ शकले नाहीत.अशा सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिलखुलास गप्पा केल्या.सैनिकांच्या परिवाराला शुभेच्छा देतांना खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा होतो याची प्रचिती आली.