विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी

28 Dec 2023 17:08:11

science-inauguration


विद्यार्थ्यांनी प्रगती करण्यासाठी विज्ञानाची कास धरावी असे मार्गदर्शन सोमवारी मी ,ग. गो.बेंडाळे विद्यालय, #विवरे ता.#रावेर येथे 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी केले.
 
यावेळी मंचा वर माझ्यासह , संस्थेचे चेअरमन धनाजी मामा लढे ,मार्तंडकाका भिरुड ,शैलेश राणे,धनंजय चौधरी, जे.के.पाटील ,प्रकाश मुजुमदार सर,दलाल सर ,राजेंद्र फेगडे सर, दखणे साहेब ,विलास कोळी ,रत्ना लोहार ,रागिणी लांडगे, गणेश धांडे,प्रभाकर बोडे, रईस सर ,दीपक सोनार,प्रफुल्ल मानकर, शालिनी मेश्राम, दीपक मराठे ,राहुल मेढे, नरेंद्र पाटील,विजय मायनाडे आदी उपस्थित होते.
 
मी व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
 
यावेळी मी माझ्या मार्गदर्शनात प्रत्येक क्षेत्रात विज्ञान पोहचले आहे. विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती करावी. विद्यार्थ्यांनी स्वतःच विषय निवडून युट्युब वर सर्च करून प्रोजेक्ट बनवावा व आपल्या शिक्षकांना दाखवावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही अभ्यास करावा.टीव्ही चा उपयोग प्रोजेक्ट साठी करावा असे संगितले.
 
फीत कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या उपकरणा बद्दल माहिती जाणून घेऊन त्यांचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0