कोविड काळात अनेक रुग्ण विलगीकरणात होते. यावेळी अतिशय चांगला उपक्रम राबवून रुग्णाच्या परवानगीने सौम्य लक्षण असलेल्या रुग्णाबरोबर दुसऱ्या रुग्णाला ठेवल्याने सर्वांना मानसिक आधार मिळाला आणि रिकव्हरी चांगली होऊ लागली. या अनुभवाचा उपयोग झाला आणि डॉक्टर केतकीताईंनी चांगला उपक्रम हाती घेतला. अशाप्रकारे विविध शिबिरांमधून बालके, गरोदर स्त्रिया, तसेच युवक आणि वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील नागरिकांना मदत करण्यासाठी एक कौन्सिलिंग सेंटर फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतात. कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्य संदर्भातली मदत या सेंटरद्वारे दिली जाते. तज्ञ कौन्सिलर्स सर्व प्रकारची मदत रुग्णांना तसेच सामान्य माणसांना करतात.