डॉ. सौ. केतकीताई
डॉ. केतकी उल्हास पाटील या जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सुलभ आरोग्य सुविधा, शिक्षणाचा स्त्रोत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि निरंतर विकासाचे धोरण राबवणे आणि कामात सातत्य राखणाऱ्या सुधारक आहेत. मूलतः सामाजिक कार्यकर्त्या असल्याने आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. केतकी उल्हास पाटील यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर काम करताना वास्तवाची जाणीव झाली आणि समाजासाठी आपण काही केले पाहिजे या उद्देशाने समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.